KKR VS RCB : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, केकेआरने २० षटकांत आठ गडी गमावून १७४ धावा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत असलेल्या रजत पाटीदारने प्रथम कर्णधारपदात आपल्या हुशारीचे दर्शन घडवले आणि नंतर फलंदाजीने १६ चेंडूत ३४ धावांची शानदार खेळी केली. प्रथम फलंदाजी केल्यानंतर केकेआरने आरसीबीसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, आरसीबीने फक्त ६ षटकांत ८० धावा केल्या. बेंगळुरूने १६.२ षटकांत लक्ष्य पूर्ण केले. फिल सॉल्टने ३१ चेंडूत ५६ धावा केल्या. विराट कोहलीने ३६ चेंडूत ५९ धावा करून नाबाद राहिला. यासह, आरसीबीने केकेआरकडून १८ वर्षांचा बदला घेतला. खरंतर, १८ वर्षांनी या दोन्ही संघांमध्ये सुरुवातीचा सामना खेळवण्यात आला. २००८ मध्ये केकेआरने आरसीबीला हरवले. आता २०२५ मध्ये आरसीबीने बदला घेतला.

KKR VS RCB : विराट कोहली आणि फिल साल्ट
KKR VS RCB विराट कोहली आणि फिल साल्ट यांच्यातील ९५ धावांच्या मजबूत भागीदारीमुळे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून एक उत्तम सुरुवात केली आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला सामना शनिवारी ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, गतविजेत्या संघाने अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर २० षटकांत आठ गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १६.२ षटकांत तीन गडी गमावून १७७ धावा केल्या आणि सामना सात गडी राखून जिंकला.
फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ९५ धावांची भागीदारी झाली. इंग्लंडच्या या स्टार फलंदाजाने केवळ २५ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सातवे अर्धशतक पूर्ण केले आणि ५६ धावांची दमदार खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला वरुण चक्रवर्तीने बळी बनवले.
त्याआधी, सॉल्ट आणि कोहलीने पॉवरप्लेमध्ये न गमावता ८० धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात आरसीबीचा हा दुसरा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर आहे. गेल्या वर्षी गुजरात टायटन्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये आरसीबीने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यावेळी संघाने पहिल्या सहा षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ९२ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, आरसीबीने केकेआर विरुद्ध पॉवरप्लेमध्ये १४ चौकार मारले. पॉवरप्ले दरम्यान आरसीबीने इतक्या चौकार मारण्याची ही तिसरी वेळ आहे.
KKR VS RCB कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकची विकेट घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या. यानंतर, सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत १०३ धावांची तुफानी भागीदारी झाली. कर्णधार रहाणेने फक्त २५ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ३१ वे अर्धशतक झळकावले. तो ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला तर वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू नरेनने पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४४ धावा केल्या.
यानंतर, केकेआरचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी एकामागून एक विकेट गमावल्या. अंगकृष रघुवंशीने ३०, वेंकटेश अय्यरने सहा, आंद्रे रसेलने चार, हर्षित राणाने पाच धावा केल्या. दरम्यान, रमनदीप सिंग सहा धावांवर आणि स्पेन्सर जॉन्सन एका धावेवर नाबाद राहिले. आरसीबीकडून कृणाल पंड्याने तीन तर जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

KKR VS RCB : विराट कोहलीने अर्धशतक ठोकले.
विराट कोहलीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ५६ वे अर्धशतक ३० चेंडूत पूर्ण केले. तो उत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी रजत पाटीदार क्रीजवर उपस्थित आहे. १३ षटकांनंतर धावसंख्या १२७/२ आहे.
KKR VS RCB अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांच्या शतकी भागीदारीमुळे, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) समोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकची विकेट घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या.
यानंतर, सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत १०३ धावांची तुफानी भागीदारी झाली. कर्णधार रहाणेने फक्त २५ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ३१ वे अर्धशतक झळकावले. तो ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला तर वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू नरेनने पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४४ धावा केल्या. यानंतर, केकेआरचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी एकामागून एक विकेट गमावल्या. अंगकृष रघुवंशीने ३०, वेंकटेश अय्यरने सहा, आंद्रे रसेलने चार, हर्षित राणाने पाच धावा केल्या. दरम्यान, रमनदीप सिंग सहा धावांवर आणि स्पेन्सर जॉन्सन एका धावेवर नाबाद राहिले. अशाप्रकारे, केकेआरने २० षटकांत आठ विकेट गमावून १७४ धावा केल्या. KKR VS RCB आरसीबीकडून कृणाल पंड्याने तीन तर जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.