Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र त्याआधी भारतीय संघात कुणाला संधी द्यायची आणि कुणाला नाही? यावरुन चर्चा सुरु आहेत.
आशिया कप 2025 स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणारअसे सांगण्यात आहेत. यूएईमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आशिया कप स्पर्धेसाठी येत्या 2-3 दिवसात भारतीय संघ मोठी घोषणा करणार आहे. मात्र त्याआधी या स्पर्धेसाठी कुणाला संधी मिळणार आणि कुणाला नाही?या चर्चेला उधाण आलं आहे . प्रत्येक स्पर्धेआधी काही ठराविक खेळाडूंच्या नावांची चर्चा कायम होतेच असते . मात्र 15 खेळाडूंमध्ये कुणाकुणाला संधी द्यायची? हे आव्हानही निवड समितीसमोर उभ राहील आहे . त्यामुळे अनेकदा नाईलाजाने काही खेळाडूंना वगळावं लागणार आहे. आशिया कप स्पर्धेत फिनीशर रिंकू सिंह याला संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.

आशिया कप २०२५ स्पर्धेचं 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणारअसे सांगितल्या जात आहे. त्याआधी 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान केव्हाही भारतीय संघाची घोषणा करू शकते. त्याआधी शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्याबाबतही निर्णय सुरु आहे.
शुबमन आणि यशस्वी ही जोडी गेल्या अनेक महिन्यांपासून टी 20i क्रिकेटपासून दूर आहे. शुबमन आणि यशस्वी वनडे आणि कसोटीत सातत्याने खेळताना दिसत आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या तिघांना इथे टी 20i मध्ये आपली जागा मजबूत केली आहे. त्यामुळे शुबमन आणि यशस्वीला संधी द्यायची की नाही? हा निवड समितीसमोर सर्वात मोठा निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे. हेच समीकरण रिंकू सिंह याच्याबाबत आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्नुसार, रिंकूची निवड होण निश्चित नाही.असे म्हटले जात आहे .
.टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी या चौघांनी आपली जागा कायम केली आहे. नितीशला इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाली होती . त्यामुळे नितीशच्या जागी ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदर याच्या नावाची चर्चा होत आहे . त्यामुळे रिंकूसाठी स्पर्धा आणखी वाढलीय इतकं मात्र निश्चित आहे .

Asia Cup 2025 : गौतम गंभीरच्या प्लानमुळे रिंकूला डोकेदुखी होणार का ?
गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून खास रणनिती अवलंबवताना दिसत आहे. गंभीर हेड कोच झाल्यापासून अशाच खेळाडूंना निवडत आहेत जे एकापेक्षा अधिक भूमिका बजावताना दिसतात . सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास गंभीरने आतापर्यंत प्राधान्याने ऑलराउंडर खेळाडूंना संधी दिली आहे. रिंकू सिंह फक्त बॅटिंग करतो. दुसऱ्या बाजूला हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर हे तिघे ऑलराउंडर आहेत. तसेच बॅकअप विकेटकीपर म्हणून जितेश शर्मा याला संधी मिळाल्यास तो फिनीशर म्हणून भूमिका बजावू शकतो. त्यामुळे रिंकूला सद्य परिस्थिती आणि समीकरणं पाहता संधी मिळणं अवघड असल्याचं चित्र आहे. मात्र निवड समिती काय निर्णय घेते? यावर सर्व अवलंबून असणार आहे.
आयपीएल मध्ये रिंकूने पाच षटकार मारून प्रसिद्धी मिळवली .
काही वर्षांपूर्वी यश दयालच्या षटकात सलग पाच षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला आयपीएल सामना जिंकून देण्यात मदत केल्याने रिंकू देशभर चर्चेत आला होता आणि तेव्हापासून त्याला भारतीय संघात फिनिशर म्हणून पाहिले जात आहे. तथापि, अलिकडच्या काळात रिंकूच्या कारकिर्दीचा आलेख थोडासा घसरला आहे आणि तो टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही (तो स्टँडबाय होता). आयपीएल २०२४ मध्ये त्याने फक्त ११३ चेंडूंचा सामना केला तर २०२५ च्या हंगामात त्याने फक्त १३४ चेंडूंचा सामना केला, ज्यामुळे त्याची भूमिका कमी झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये, भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे केकेआरचे मुख्य रणनीतिकार होते.
Asia Cup 2025 : या पहिले पाच खेळाडूंना संधी मिळू शकते का ?
जर सर्वजण तंदुरुस्त आणि उपलब्ध असतील तर अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (फलंदाज-विकेटकीपर), तिलक वर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांची पहिल्या पाचमध्ये निवड निश्चित आहे. जर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारे गिल आणि यशस्वी जयस्वाल संघात परतले तर निवडकर्त्यांना एक किंवा दोन जागांसाठी काही तडजोड करावी लागेल. एका माजी राष्ट्रीय निवडकर्त्याने पीटीआयला सांगितले की, ‘आपण अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकतो की एखाद्या विशिष्ट खेळाडूची निवड करावी, परंतु कोणीही आपल्याला ‘कोणाच्या जागी’ सांगू शकत नाही? श्रेयस अय्यरने १८० च्या स्ट्राईक रेटने ६०० धावा केल्या आहेत, परंतु तो पहिल्या चारमध्ये फलंदाजी करतो.
त्याच्यासाठी जागा कुठे आहे? जर तुम्ही आत्ता तुमचे पहिले पाच खेळाडू बदलू शकत नसाल तर तुम्ही शुभमनची निवड करू शकत नाही. जर तुम्ही आत्ता शुभमनची निवड केली तर स्पष्टपणे कसोटी कर्णधाराला वगळता येणार नाही. तर तुम्ही कुठे तडजोड कराल? रिंकूच्या जागेबद्दल मला शंका दिसते कारण काही टॉप ऑर्डर फलंदाजांना त्याची फारशी गरज नाही. आणि लक्षात ठेवा, आम्ही जयस्वालबद्दल बोलतही नाही आहोत.’ रिंकूसोबत तडजोड झाली तरी, शिवम दुबे (कारण नितीश रेड्डी तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे) आणि जितेश शर्मा (दुसरा यष्टीरक्षक) हे संघात असतील, जे फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे बजावू शकतात.
रिंकूला Asia Cup 2025 मध्ये संधी मिळणे कठीण आहे.
केकेआरच्या माजी थिंक-टँक प्रमुखांनी रिंकूचा ज्या पद्धतीने वापर केला त्यावरून असे दिसून येते की अलीगढच्या डावखुऱ्या फलंदाजाची त्याच्या योजनांमध्ये खूपच मर्यादित भूमिका होती. प्रत्येक फलंदाजीच्या जागेसाठी स्पर्धा पाहता, पुढील वर्षीच्या सुरुवातीला भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी रिंकू हा आपोआप निवड होईल असे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही. परंतु सध्या फक्त आशिया कप टी-२० चा विचार केला तर रिंकूची स्थिती थोडी डळमळीत दिसते.