भारत 2025 मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकात ICC ने मोठा बदल केला आहे. बंगळूरुमधून अचानक यजमानपद काढून घेण्यात आलं आहे.
women world cup 2025 schedule चे सामने भारतात होणार आहेत. नुकतंच या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषक सुरू होण्याआधीच ICC ने वेळापत्रकात एक मोठा बदल केला आहे. या बदलानुसार, बंगळूरुऐवजी नवी मुंबईला आता पाच प्रमुख ठिकाणांपैकी एक म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे.
डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये महत्त्वाचे सामने
बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमची अनुपलब्धता हे या बदलाचं कारण आहे. आता नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये पाच सामने होतील, ज्यात तीन लीग सामने, एक सेमीफायनल आणि फायनलचा समावेश आहे. स्पर्धेच्या तारखांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्या 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत आहेत. इतर ठिकाणंही तीच आहेत, ज्यात गुवाहाटी (एसीए स्टेडियम), इंदूर (होळकर स्टेडियम), विशाखापट्टणम (एसीए-व्हीडीसीए स्टेडियम) आणि कोलंबो (आर. प्रेमदासा स्टेडियम, श्रीलंका) यांचा समावेश आहे.
ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी या नव्या ठिकाणाबद्दल आपलं मत व्यक्त करत म्हटलं की, हे महिला क्रिकेटसाठी एक आदर्श ठिकाण आहे. ते म्हणाले, ‘नवी मुंबई गेल्या काही वर्षांपासून महिला क्रिकेटचं खरं केंद्र बनलं आहे. इथे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आणि महिला प्रीमियर लीगमध्ये जो पाठिंबा मिळाला, तो अप्रतिम आहे. मला खात्री आहे की 12 वर्षांनंतर भारतात परतणाऱ्या या विश्वचषकाच्या सामन्यांमध्येही तीच ऊर्जा पाहायला मिळेल.’

women world cup 2025 schedule
या विश्वचषकाची फायनल 2 नोव्हेंबर रोजी कोलंबो किंवा नवी मुंबईत खेळली जाईल. पहिला सेमीफायनल 29 ऑक्टोबर रोजी गुवाहाटी किंवा कोलंबोमध्ये, तर women world cup 2025 schedule दुसरा सेमीफायनल 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत होईल. जय शाह पुढे म्हणाले, ‘हा विश्वचषक खेळाचं भविष्य घडवेल. अनपेक्षित परिस्थितीमुळे आम्हाला वेळापत्रक आणि ठिकाणांमध्ये बदल करावा लागला, पण आता आमच्याकडे पाच जागतिक दर्जाची ठिकाणं आहेत याचा आम्हाला आनंद आहे.’ या स्पर्धेतून नवीन पिढीच्या चाहत्यांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे अपडेट केलेले पूर्ण वेळापत्रक, सामन्यांची ठिकाणे आणि तारखा
women world cup 2025 schedule
तारीख — वेळ ——- सामन्याचे ठिकाण
मंगळवार, ३० सप्टेंबर दुपारी ३:३० भारत विरुद्ध श्रीलंका गुवाहाटी
बुधवार, १ ऑक्टोबर दुपारी ३:३० ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड इंदूर
गुरुवार, २ ऑक्टोबर दुपारी ३:३० बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान कोलंबो
शुक्रवार, ३ ऑक्टोबर दुपारी ३:३० इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका गुवाहाटी
शनिवार, ४ ऑक्टोबर दुपारी ३:३० ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका कोलंबो
रविवार, ५ ऑक्टोबर दुपारी ३:३० भारत विरुद्ध पाकिस्तान कोलंबो
सोमवार, ६ ऑक्टोबर दुपारी ३:३० न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका इंदूर
मंगळवार, ७ ऑक्टोबर दुपारी ३:३० इंग्लंड विरुद्ध बांगलादेश गुवाहाटी
बुधवार, ८ ऑक्टोबर दुपारी ३:३० ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कोलंबो
गुरुवार, ९ ऑक्टोबर दुपारी ३:३० भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका विशाखापट्टणम
शुक्रवार, १० ऑक्टोबर दुपारी ३:३० न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश गुवाहाटी
शनिवार, ११ ऑक्टोबर ३:३० दुपारी इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कोलंबो
रविवार, १२ ऑक्टोबर दुपारी ३:३० भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विशाखापट्टणम
सोमवार, १३ ऑक्टोबर दुपारी ३:३० दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश विशाखापट्टणम
मंगळवार, १४ ऑक्टोबर दुपारी ३:३० न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कोलंबो
बुधवार, १५ ऑक्टोबर दुपारी ३:३० इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कोलंबो
गुरुवार, १६ ऑक्टोबर दुपारी ३:३० ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश विशाखापट्टणम
शुक्रवार, १७ ऑक्टोबर दुपारी ३:३० दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका कोलंबो
शनिवार, १८ ऑक्टोबर दुपारी ३:३० न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान कोलंबो
रविवार, १९ ऑक्टोबर दुपारी ३:३० भारत विरुद्ध इंग्लंड इंदूर
सोमवार, २० ऑक्टोबर दुपारी ३:३० श्रीलंका विरुद्ध बांगलादेश नवी मुंबई
मंगळवार, 21ऑक्टोबर दुपारी ३:३० दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कोलंबो
बुधवार, २२ ऑक्टोबर दुपारी ३:३० ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड इंदूर
गुरुवार, २३ ऑक्टोबर दुपारी ३:३० भारत विरुद्ध न्यूझीलंड नवी मुंबई
शुक्रवार, २४ ऑक्टोबर दुपारी ३:३० वाजता श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान कोलंबो
शनिवार, २५ ऑक्टोबर दुपारी ३:३० वाजता ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका इंदूर
रविवार, २६ ऑक्टोबर सकाळी ११:०० वाजता इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड विशाखापट्टणम
रविवार, २६ ऑक्टोबर दुपारी ३:३० वाजता भारत विरुद्ध बांगलादेश नवी मुंबई
बुधवार, २९ ऑक्टोबर दुपारी ३:३० वाजता उपांत्य फेरी १ गुवाहाटी/कोलंबो
गुरुवार, ३० ऑक्टोबर दुपारी ३:३० वाजता उपांत्य फेरी २ नवी मुंबई
रविवार, २ नोव्हेंबर दुपारी ३:३० वाजता अंतिम फेरी नवी मुंबई/कोलंबो